शब्द म्हणजे काय असतं,
भावनांनी भरलेलं एक गाव असतं,
शब्द म्हणजे व्यक्त होण्याचा संदर्भ असतो,
व्यक्ती आणि विषयाला जोडणारा तो पूल असतो,
स्तुती सुमनांची शब्दांत भरलेली भेळ असते,
राग-रोषांचा जणू शाब्दिक खेळ असतो,
शब्द विचारांचा भक्कम पाया असतात,
शब्द म्हणजे बोलण्यासाठी लागणारे बळ असतात,
शब्द म्हणजे चकाकणाऱ्या तलवारीची धार असते,
शब्द म्हणजे माउलीच्या मायेची पाखर असते.
शब्द जन्म आणि मृत्यूचे मार्मिक वर्णन असतात,
स्वर्गाचे द्वार असे हे "शब्दांच्या पलीकडले शब्द" असतात.
फारच सुंदर अप्रतिम लिहिलं आहेस
उत्तर द्याहटवामंदार वाचून झाल पण, धन्यवाद
उत्तर द्याहटवाशब्दांच्या पलीकडले शब्द अपेक्षित होते... पण हा शब्दांचा निबंध वाटतोय... वाचनीय आहे, फक्त रचना माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे
उत्तर द्याहटवाअभिषेक हो रे!!!! रचना नाही जमली पण पुढच्यावेळेस नक्की लक्ष देईन......
उत्तर द्याहटवाधन्यवाद
मस्त यार खूपच छान
उत्तर द्याहटवालक्ष लक्ष धन्यु रे, गजानन
उत्तर द्याहटवा