अज्ञात या प्रेमाचा उलगडा न लागला रे !
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
एकाच कडेचा मनी परी द्वंद का लागला रे !
तुज मोहणे जड मज मनी असंख्य बंध का रे !
प्रेमे आनंदे नाहि मी एकतर्फी जाहले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
आठवणीत तुझ्या अंगी माझ्या शहारे भारले रे !
एक झलक पाहताची मनी या तारे बरसले रे !
तुटलेले प्रेम जरी तुझ्या प्रेमरंगी रंगले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
डोळ्यात माझ्या तुझे रूप कसे साठवू रे !
जरी अनामिक नाते हे तुवा कसे जोडू पाहू रे !
नक्षत्रे परी ओघळली, नयनी अश्रू तरळले रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
अस्ताव्यस्त स्वप्ने, उध्वस्त का ते वादळ रे !
ओळख कुठली माझी मी तुझ्यात हरले रे !
एक सावली जणू मी नाही तुझी राधा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
प्रेम न मिळले जरी, जन्म पडला भाळी रे !
आरंभ तूची म्हणोनी, दिन-रात्र माझी काळी रे !
प्रेम का ते दैन्य पदरी मी ना तुझी मीरा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!
का मृत्यू आजी ना विचारी मजसी रे !
शांती या मनीची कैशी क्षणात विझली रे !
सखा का प्रेम माझा सांग तू कान्हा रे !!
मनी माझ्या जणू तूची एक कृष्ण जाहला रे !!