ब्लॉग संपादकीय..

कल्पेश वि. मोहिते
                                                    
_________________________________________________________________________
_________________________________________________________________________ 

प्रिय ब्लॉगर मित्र-मैत्रीणींनो,
        
                                       तुमच्या लाभणाऱ्या सहकार्याने माझ्या लिखाणाचा विचार अजून वाढीस लागला आहे. आज तुमच्या प्रेमाने मी ब्लॉग लिहिण्यास आणि बनविण्यास शिकलो आहेच. तरी विषय आणि संदर्भ जाणून मी रोज रोज नव नवीन गोष्टी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीतच राहीन. ब्लॉग जगतात. माझ्या बोलण्याला आणि विचारांना फुटलेली हि वाट आहे अस मी मानतो आणि त्याचा मला  अतिव आनंद होतोच आहे. नवीन नवीन गोष्टी स्वतः लिहिण्यापूर्वी तयारी करतोच आहे आणि विचार सुद्धा करतोच आहे.आणि म्हणूनच मी या ब्लॉगच्या पोस्ट मध्ये काही सुंदर वाटलेल्या गोष्टी सुद्धा टाकल्या आहेत.
                                      आवड - निवड प्रत्येकात असते पण प्रत्येकाला ती जपता येतेच असे नाही. पण अथक प्रयत्न केले कि योग्य गोष्ट प्राप्त होतेच. माझ्या आवडीच्या गोष्टी मी या ब्लॉगवर शेअर करतोच आहे. पण कश्या वाटतात इथपासून तुम्ही कळवावे. इतकीच इच्छा. सुख आहे. दुख आहे. प्रश्न आहेत. उत्तर आहेत. विचार आहेत. सर्व  काही इथे मांडण्यासारख, मनाच्या कोनाड्यात लपलेल्या शब्दांना आणि विचारांना फुटलेली हि वाट मी अशीच निरंतर चालू ठेवेन, आणि तुमच्या शुभेच्छा लाभतीलच.
________________________________________________________________________


माझ्याबद्दल.........

                      मी पण तुमच्या सारखा साधारण व्यक्ती आहे. पण असाधारण जगण्यावर भर द्यायला खूप आवडते. वास्तव्य ठाणे इथे लहानपणापासून आणि बऱ्याच चांगल्या गोष्टींमध्ये रस आहे. लेखन, चित्रण खूप आवडीचे विषय, संगीत विषयक गोष्टी आवडीच्या आहेत. खूप मित्र मैत्रिणी असाव्यात म्हणून इच्छा मनाशी बाळगतो.

 बस इतकेच अजून काही नाही.आपले नम्र,
कल्पेश वि. मोहिते  
_________________________________________________________________________


विशेष सूचना :-
               या ब्लॉग वरील साहित्य (लेख, गोष्टी, कथा, कविता व गाणी) सर्वस्वी स्व-लिखित आहे, जर इतर संबधित किंवा आवडीच्या साहित्याचे पुन:प्रकाशन केले असल्यास त्या प्रकाशित साहित्यखाली तसे नोंदविलेले आहे. तसेच ब्लॉग वर लिहिण्या करिता सर्वस्वी आंतरजालाचीच मदत घेतली जाते. तरीही आपणास आलेल्या किंवा जाणवलेल्या प्रश्नांना आपण ब्लॉगच्या साहित्यखाली लगेचच प्रतिक्रिया नोंदवू शकता. संबंधित साहित्य © copyright Tue Feb 08 13:08:55 UTC 2011 - All Rights Reserved च्या माध्यमातून सुरक्षित केले गेलेले आहे.  
               मला संपर्क साधण्यासाठी आपण  इतर गोष्टींचा उपयोग करू शकता.