मंगळवार, जून २८, २०११

चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला


  भिक मागुनी सुद्धा पदर नाही भरला.
  "दे माय" ची हाक ऐकूनही कुणी काना-डोळा नाही केला.
  एक भाकरी शिळी मिळेल का हो पुढ्यात
  फाटक्या पदराशी जीव स्वतःचा बांधला, 
  तरी तिचा चाराण्या चाराण्यासाठी जीव वेडा जाहला.

कशी ती माय दुखाची आसवे काढिते,
रडते परी आपल्या पिलांना आठविते,
मळक्या आयुष्याच्या प्रश्नांचा खेळ हा,
सोडूनी दिली त्या मायेला पिल्लाने भर रस्त्याला
तरी तिचा चाराण्या चाराण्यासाठी जीव वेडा जाहला.

सारी वाढविली पिल तिने मोठा केला गोकुळ,
संसाराच्या गाड्यात तिचा जीव सदा व्याकूळ,
एकटीच्या मरण यातना पिलांना नाही पोचल्या
रंग तिचा भंग परी तिने त्याला ओशळता केला.
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.

फुटले पंख पिल्लाला अन उडोनिया गेला आकाशी
माय मागे ठेवोनिया चित्त लावले संसारापाशी
केली फोडणी तत्वांची तिला एकटे केले जगी
परी नाही फोडिला टाहो अन नाही कल्लोळ केला
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.

वार्धक्याच्या सरतेवेळी कुणी नाही माझे
अर्ध्यावर राहिले आयुष्य नाही अग्नीस कुणी साझे
माय होती ती तिची आठवण नाही राहिली त्याला
एकटीचा जीव तिचा तीळ तीळ तुटत राहिला
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.  

कल्पेश मोहिते

सोमवार, जून २७, २०११

एक माहिती आपल्याच भगवतीची...........


कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर


         


                 महालक्ष्मी मंदिर पुराणात लिहिलेल्या १०८ शक्तिपीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात सन ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.

            कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत गणना होते.
मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ. . १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.                       मंदिराची वास्तू                           


  


         मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे सम्मत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्री पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .


देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंगी, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.


महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.


शुक्रवार, मंगळवार हे देवीचेदिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.


नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.
अधिक इतिहास व थोडी माहीती

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले हे निश्‍चितपणे सांगता येत नसले तरी ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथियांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे १७२२ मध्ये दुसऱ्या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते. हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाच्याखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात. प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होवू नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो १८४४ ते १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधाकॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत. देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाण्याऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखी मध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्‍इवन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. आश्‍इवन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.या दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ते महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात आणि तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा चमत्कार जवळ जवळ पाच मिनटांपर्यंत चालतो. या दिवशी देवीला खास प्रार्थना केली जाते. हा चत्मकार पहाण्यासाठी भाविक मोठया संख्येने जमा होतात. हा मुहूर्त पुजारी पंचांग पाहून ठरवितात. देवळाची बांधणीच अशातऱ्हेने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात. महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दॄष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी. नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणाऱ्या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे. वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.


सौजन्य विकिपीडिया

भांडणाचा कार

      
 
            

                   जीवनात बऱ्याच गमती जमती घडतच असतात. आणि त्यात भाषेवरून झालेल्या गमती जमती तर रोजच्याच हो न! आपल्या भाजीवाली आणि गुजराथी बायकांची एक गोष्ट आठवून पहा. आणि आपली मुंबई तर या वाद विवादांनी खच्चून भरलेली असते. लोकलमध्ये बसमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतेच न.... अशीच एक एक गम्मत पाहून मला सुद्धा हसू फुटतेच....

                        एकदा असेच माझ्या बँकमध्ये मी काही कामाकरिता गेलो होतो. तिथे एक मराठी बोलणारी बाई आली होती. तशी ती शांत वाटली. आणि लुक म्हणजे अगदी टिपिकल मराठीबाई सारखा साधाच, मी टोकन घेऊन नंबर येईपर्यंत समोर सोफ्यावर बसलेलो.समोरून आलेल्या त्या बाई पासबुक खिडकी वर पासबुक एन्ट्री करण्यासाठी गेल्या. खिडकीत बसलेल्या एका मद्रासी बाई ने पासबुक हातात घेतले. आणि प्रिंटींग मशीन मध्ये टाकले, आणि पटकन त्या मराठी बाईला म्हणाली, "आप का कितना दिन से एन्ट्री बाक्की, अय्यो" अस बोलून ती मागच्या बसलेल्या हेड एकाउन्टट साहेबांना काहीतरी पुटपुटली. आणि पुढे होऊन पुन्हा मराठी बाईला म्हणाली, "अब टाइम लगेगा, आप जाके उदर सोफे पर बैटो! वक्के. जस्ट वेट", "व्हॉट अ वूमन, बोलून तोंडातल्या तोंडात तिच्या भाषेत काहीतरी पुटपुटली." त्यावर ती मराठी बाई पटकन आपल्या अस्सल मराठी मध्ये बोलली, "क्काय? कसला टाइम लगेगा. लवकर एन्ट्री करके दो!" समोरच्या मद्रासी बाईच्या तोंडावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दुसरयाच क्षणाला मराठी बाई बोलली,"तुला क्काय प्रोब्लेम हाय ग! गप एन्ट्री कर कि" सगळी लोक अव्वाक झाली आणि तिच्या तोंडाकडे पाहू लागली. तिच्या डोक्यावर आठ्या पडल्या होत्या. घाबरून समोरच्या मद्रास्णीने व्यवस्थापकांना बोलाविले. पण तो पर्यंत मराठी बाईने जणू काही साफ सफाई करायचाच ठरवले होते. एक माणूस त्यांना जाऊन म्हणाला,"काय झालं बाई कशाला चिडता?" त्यावर "न्हाईतर काय, हिला अक्कल हाय का काडीची हिला काय करायचय मी एन्ट्री रोज रोज करीन न्हाईतर महिन्यातून करीन न्हाईतर वर्षातून करीन. हि कोण मल्ला सांगणारी?" असं सटासट उत्तर दिल. कुणाला काही समजेना ती कशावरून इतकी भडकली? का भडकली? सगळी कडे लोक काम थांबवून तिच्या कडे पाहत होते. व्यवस्थापक आले आणि उद्रेकच झाला. "इस बाई को कूच नही कळता है तर कशाल्ला रक्का हिला कामपर, हि मेरकु बोलते" असा काहीस उलटच झालं. व्यवस्थापक सरळ समोरच्या मद्रासणीला माफी मागायला लावली. आणि पासबुक द्यायला लावल. मद्रासणीला रडू कि काय करू असे झाले होते. ती गप्प बसून आपले काम करू लागली. तोपर्यंत माझा टोकन सुद्धा आला होता. मी आपले काम उरकले आणि सरळ बाहेर पडायला निघालो. तर मराठी बाई माझ्या बाजूनेच निघाल्या. त्या थांबून थोडस हसल्या. मग मी पटकन विचारून घेतलचं, "तुम्ही मघाशी इतक्या का भडकल्या त्या मद्रास्णीवर." तर त्या इतक्या स्वच्छ मराठीत बोलल्या कि, " कि ते मी तिला धडा शिकवत होते, मला कन्नड सुद्धा येते. आणि ती मला त्या भाषेत "काय बाई आहे हि! अजून महिन्याभराने यायचं न!" असं म्हणाली म्हणून मी जरा तिला घाबरविण्याकरिता असं बोलत सुटले." असं बोलून त्या मात्र निघून गेल्या. महाराष्ट्राचा अभिमान असल्यागत म्हणजे जो असायलाच हवा असा ती बाई तरा तरा पुढे निघून गेली. पण ती आत खेडी बायकांसारखी का बोलत होती? ते विचारायचं राहिलेच विचार कसा आणि कुठे करावा हे गणितच चुकले. असे बरेच विनोद तुमच्या हि आस-पास सुद्धा घडलेच असणार. 

अजून एक गोष्ट हसणे आरोग्यासाठी चांगलेच असते.

रविवार, जून २६, २०११

बालगंधर्व..... स्मृती दर्शन

नमन नटवरा विस्मयकारा । नमन नटवरा विस्मयकारा ।।

                             वरील रंगदेवतेच्या सुश्रोषीत ओळी आज आठवल्या आणि रंगभूमीच्या सुरवातीला नाट्यसंगीताने रंगभूमीला झळाळून काढणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्वाचे नाव आठवले. लोकमान्य टिळकांच्या स्वरात, "अरे हा तर बालगंधर्व!" या स्तुतीसुमनांनी ज्यांचा गौरव झाला ते आपले बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस. बालगंधर्वांचा जन्म २६ जून १८८८ मधील सांगलीतील नागठाणे गावी झालेला, त्यांच्या गळ्यात लहानपणा पासूनच सरस्वतीचा आशीर्वाद वसलेला, उत्तम गायकी आणि स्त्री-रंगभूषेत स्त्री-नेपथ्य सादरीकरण हे वैशिष्ट्य तसेच नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते अश्या सर्व गायन प्रकारांवर प्रभुत्व, पं. भास्करबुवा बखले यांचे ते शिष्य होते. कारकीर्दीच्या सुरवातीपासूनच त्यांची गाण्याची पद्धत आणि संस्कार लोकान्मुख झालेले होते. आणि तेव्हाच त्यांना बालगंधर्व हि पदवी लोकमान्यांनी बहाल केली होती.
                              बालगंधर्वांच्या जीवनावर आधारित सुंदर मराठी चित्रपट नुकताच आला हा बालगंधर्व आपण पहिलाच आहे. त्यातच आपल्याला समजते कि  बालगंधर्वांचे आयुष्य आपल्या कलेला किती वाहलेले होते. आज त्यांच्या स्मृतीत आपण कितीतरी त्यांची गाणी ऐकतो, वाचतो. आज त्यांचा जीवनपट वाचायला खूप साधने आहेत. त्या थोर कलासेवकाचे आजता गायत कित्ती तरी चाहते झाले असतील. पण त्यांच्या जीवनपटापेक्षाहि अत्यंत खडतर तर तेव्हाचे आयुष्य होते. नितीन चंद्रकांत देसाई कृत बालगंधर्वमध्ये पाहताना त्याच्या त्या खडतर आयुष्याची कहाणी एकदम जवळ येवून जाते. तेव्हाच्या काळी नाटक विश्वात स्त्री-पात्र करण्यासाठी स्त्रिया पुढे येत नसत आणि तशी त्यांना मनाई पण होती. तरीही स्त्री पात्र हुबेहूब रंगमंचावर आणण्याचे काम बालगंधर्वांनी केले. त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके केली. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. शाकुंतल नाटकातील शकुंतला आणि मानापमान या नाटकातील भामिनी मुळे तर बालगंधर्वांनी आपले नाव  यश्याच्या उच्च शिखरावर नोंदवले. त्यांची ओळख जगात प्रतिभावंत जाहली. भरजरी साड्या आणि दागिने घालून जेव्हा बालगंधर्व रंगमंचावर अवतरत तेव्हा लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटायचे. मध्यंतरी काळात त्यांनी बरेच धक्के खाल्ले. बरायचं संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. परिस्तिथी कडेलोट होत असतांना सुद्धा त्यांनी रसिकजनाचा विचार केला आणि नाटके गाजवली. पत्र आणि नाट्य रंगमंचावर कसे उठून दिसायला हवे हे बालगंधर्वांच्या नाटकातून वाखाणण्याजोगे होते. बहुतांश मंडळी आजही त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून जगतात. १९५५ साली त्यांनी एकाच प्याला मध्ये साकारलेली सिंधू हि त्यांची शेवटची भूमिका होती. तदनंतर रंगविश्वातून त्यांनी निवृत्ती घेतली. १५ जुलै १९६७ मध्ये बालगंधर्वांचे निधन झाले. आणि रंगभूमीचा मोलाचा आशीर्वाद हरपला.
                              
  बालगंधर्व नावातच असलेली एक सुंदर व्याख्या म्हणजे त्यांचे नाव जसे आज अजरामर आहे. त्या पद्धतीने ते संपूर्ण रंगभूमीत सुद्धा वसलेले आहे. रंगशारदेच्या त्या महान व्यक्तिमत्वास माझे शतश: नमन आणि तुम्हा सर्वांना सादर प्रणाम.

मराठी रंगभूमीच्या या दिव्यरत्नाबद्दल माहिती
सांगावी तेव्हडी कमीच आहे. तसेच या स्मृतीप्रित्यर्थ लिहिलेला हा लेख गुगल आणि विकिपीडियाच्या सहाय्याने पूर्ण केला आहे आणि तसेच अधिक माहिती करिता खालील दुव्यांवर कृपया टिचकी मारा.

http://mr.wikipedia.org/wiki/नारायण_श्रीपाद_राजहंस


गुरुवार, जून २३, २०११

आयुष्य सर्वात महत्त्वाचे..                  एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...

असा वाटण्याची जागा मग ,

मूल झालं की...

मोठं घर झालं की...

अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .

दरम्यानच्या काळात , आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

आपल्या दाराशी एक गाडी आली की...

आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...

निवृत्त झालो की...

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.

आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का ?जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.

पण, मध्ये बरेच अडथळे असतात . काही आश्‍वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो,

काही ऋण फेडायचं असतं ....

आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,

आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.

आनंद हाच एक महामार्ग आहे.

म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी. .. महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो .

एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू .

२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?

३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?

४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ?हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .

पदकं आणि चषक धूळ खात पडतात.

जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -

१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.

२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?

३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?

४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा .

आयुष्य अगदी छोटं आहे.

तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ?मी सांगतो.जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....आता एक गोष्ट.

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.धावता धावता

एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण..."डाउन्स सिन्ड्रोम” ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, 'आता बरं वाटतंय?' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...

त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.

का?कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते .आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा . त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...

दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही…. नाही का?

मंगळवार, जून २१, २०११

इंग्रजी

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका ...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!


नोट : आवडलेल्या कवितांचे कवी/कवियत्री चे नाव माहित नसून फ़क़्त ब्लॉग वर वाटून घेण्यात आलेल्या आहेत. 

आई

 जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।

  असे ऋण हे की जया व्याज नाही।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

  जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।

  जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।

  जिने लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

  जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई।।

 नोट : आवडलेल्या कवितांचे कवी/कवियत्री चे नाव माहित नसून फ़क़्त ब्लॉग वर वाटून घेण्यात आलेल्या आहेत.

मैत्रीच्या पावसात..मैत्रीच्या पावसात..
मैत्रीच्या पावसातstudent_group
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
“काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!


मैत्री म्हटली कीFrnds
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…नोट : आवडलेल्या कवितांचे कवी/कवियत्री चे नाव माहित नसून फ़क़्त ब्लॉग वर वाटून घेण्यात आलेल्या आहेत. 

मैत्री
मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही


मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे...
नोट : आवडलेल्या कवितांचे कवी/कवियत्री चे नाव माहित नसून फ़क़्त ब्लॉग वर वाटून घेण्यात आलेल्या आहेत. 

गुरुवार, जून ०९, २०११

अतः बुद्धम.....

                   शीर्षक वाचून चरित्र लेख असल्यागत वाटल हो ना........ मला वाटलेलंच पण काय आहे मला शीर्षक सुचलंच नाही. तर आता सांगतो लिहिण्याच कारण काय ते, परवा मी माझ्या एका मित्र सोबत असाच फिरत होतो. तेव्हा गप्पा मारता मारता त्याने विचारले कि, "भगवान गौतम बुद्ध हे माणूस होते. असा मी आज वाचल!" मी थोडा चकित झालो आणि त्याला विचारले कि, "हा प्रश्न का?" तर त्याने उत्साहाने सांगितले कि, "हा प्रश्न मी सकाळी एकाकडून एकल, आणि त्याच उत्तर तूच देऊ शकतो आता मला तू सांगच." माझ्या मनात आले "कि हा आज वेताळ झाला आहे कि काय आणि मी स्वतःला विक्रम समजू लागलो" मस्करी नको म्हणून मी त्याला हसत उत्तर दिल कि "हो, भगवान बुद्ध हे माणूसच होते, परमेश्वराने साक्षात मानवाला दर्शन कधीच दिलेले नाही आणि देणारही नाही. पण त्याने जशी आई बनवली तसेच त्याने माणुसकी दर्शविण्यासाठी काही थोर पुरुषांना जन्म दिला".
          थोडासा वेळ गेला आम्ही फिरून झालं. आणि मघाचा प्रश्न पुन्हा त्याने विचारला मग मी त्याला संपूर्ण माहिती सांगितली. भगवान बुद्ध म्हणजे राजा सिद्धार्थ याने आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. तर पुन्हा "का? म्हणून" प्रश्न केला. आता काय कराव खरोखर मी राजा विक्रम झालो होतो. "हम्म, मग समजावून सांगितलं ते एक मानवच होते. बुद्ध आर्य वंशज होते त्यांची आई राणी मायादेवी व वडील राजा शुद्धोधन हे होते.त्याचं खर नाव राजा सिद्धार्थ होत. पण लहानपणापासून राजघराण्यात राहिलेल्या सिद्धार्थला दुख: या गोष्टी पासून अलिप्त ठेवण्यात आले होते. पण वयात आल्यावर सिद्धार्थ स्वतः त्या गोष्टींच्या समोर जाऊ लागला होता. २९-३० वयापर्यंत त्यांनी दुख:, दारिद्र्य, दैन्य पाहिले पण नंतर त्यांनी याचे मूळ कारण काय? आपण इतके लोभी, क्रोधी, अहंकारी का होतो? मनुष्य अश्या पद्धतीने का जगतो? असे कित्तेक प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागले होते. त्यात त्यांनी पाहिले कि सगळ्यांचा जन्म आहे, सगळ्यांनाच म्हातारपण, आजारपण आहे आणि सगळ्यांनाच विधिलिखित मृत्यू आहे. पण हे का आहे. हे कसं आहे. हे शोधण्यासाठी त्यांनी आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. आणि रानात निघून गेले.त्यांनी तिथे खूप तप केले. जप केले पण त्यांच्या हाती या गोष्टींच मूळ काही लागेना आणि त्यांना विचार पडे कि कसे शोधावे त्याचे मूळ. त्यांनी कठोर तपस्या केली आणि त्यात ते मृत्युच्या जवळ जाऊन आले. पण अजूनही समाधान नव्हते. नंतर त्यांनी तपस्या सोडून अष्टांग मार्ग वापरले. ते आपण ओळखतो सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति, सम्यक समाधि. या नावांनी आणि आपण यांचा रोजच आपण उपयोग सुद्धा करतोच ना." मग माझ्या मित्राला ते समजल. कि ते मानव होते. पण त्यांनी या गोष्टींचा छडा लावण्यासाठी त्याग केला होता. त्याला पटले कि त्यांचा त्याग खरंच आजच्या माणसापेक्षा मोठा होता आणि खरा होता.
           असच राहून राहून पुन्हा मीच त्याला विचारले कि "काय रे तुला बुद्ध म्हणजे काय हे माहिती आहे का?" त्याने म्हटले कि "नाही". माझ्या मते जे काही आहे ते मी त्याला सांगितलं "बुद्ध म्हणजे बुद्धीच्या जोरावर ज्ञान मिळविलेला आहे तो, ज्ञान येणे अत्यंत महत्वाचे पण ज्ञान मिळविणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे, देव आपल्याला बुद्धी देतो पण तिचा उपयोग आणि त्याची उद्दिष्ट पार पडणे हे आपल्या हातात असते. म्हणून जो बुद्धीवर विजय मिळवतो तो बुद्ध. आणि सिद्धार्थाने ते मिळविले म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वार्थ भावाने उपयोग न करता  इतर जनतेसाठी उपयोग केला. त्या ज्ञानातून प्रत्येक व्यक्तीने खूप बोध घेऊन दुखा:ने भरलेले आपले जीवनविश्व कसे मार्गी लावावे हे शिकून घेतले. शिक्षण असले तरी त्याच्या परे काही शिकण्यास मिळाले तर आयुष्य सोप्पे होते. बुद्धांनी त्यांच्या वैवाहिक, व्यावहारिक आणि सामाजिक बांधिलकीच्या जीवनाला सोडून जीवनातील अष्ट दुखांच्या विरोधात उभे राहून आपल्या जीवनात आनंद कसं आणता येईल आणि जीवन अजून सुखकर कसे करता येयील हे त्यात दाखवून दिले. आपण मनुष्य आहोत मनुष्य मनात काही ठरवून ती गोष्ट पार पडू शकतो. जीवन व्यतीत करणे म्हणजे फ़क़्त जगणे नाही याचा अर्थ बुद्धांनी दिला, आणि हे सर्व सिद्धार्थांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मिळविले होते  म्हणूनच त्यांना बुद्ध म्हंटले जाते". बुद्धांची इतकी माहिती दिली तरीही माझ्या मित्राच मन काय भरलं नव्हत. आणि डोक्यावरून प्रश्न चिन्ह काही उतरत नव्हतं पुन्हा विचारले त्याने कि मग त्यांना भगवान का म्हणतात? आता माझ्यातला विक्रम खूप पेंगला होता इतक सांगून पुन्हा आणखीन काहीतरी नवीन. परत त्याने विचारले कि "भगवान तर देवाला बोलतात न मग बुद्ध हे देव नव्हते तर त्यांना का भगवान बोलतात." मी सांगितले कि, "लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नको, आता भगवान देवालाच म्हणतात असं कोण बोललं देवाला आपण काय म्हणून ओळखतो. देव आपल्याला सदैव देणारा, देणारा कधी पण मोठ्ठा असतो म्हणून त्याला भगवान म्हणतात. बुद्धांनी त्यांच्या ज्ञानाचा अपव्यय नाही केला नाही स्वार्थभावाने स्वत: करिता राखून ठवले. तर सर्व जगात आपले अनुयायी पाठवून प्रसार केला आणि त्या माध्यमातून लोकांना सरळ मार्ग दाखवला. त्यांच्या अष्टांग मार्गाचा अवलंब करणारा व्यक्ती त्यांना ज्ञान रुपी देव मानू लागला. म्हणून त्यांना भगवान गौतम बुद्ध म्हणून संबोधले जाते."
         त्यांचं कार्य महान आहे माझी माहिती तर त्यांच्या कार्यासमोर खूप लहान आहे. मला जितक माहिती आणि माझ त्यांच्याविषयी जितक स्पष्ट मत आहे. त्याप्रमाणे सांगण्याचा हा तुला प्रयत्न बाकी सर्व सिक्लोच आहे शाळेत त्याच्या विचारांच्या अनुरूप जगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. बाकी त्यांच्या नावाने चाललेले वाद विवाद वैगेरे आपल्याला नाही ठावूक. आणि कुणाच्या धर्माला दुखावणे हा हेतू तर अजिबात नाही. भगवान बुद्धांच्या तीनही प्रतिमांना माझे त्रिवार अभिनंदन. माझे इथे काही चुकले असेल तर कृपया क्षमा असावी. त्यांच्याच प्रमाणे भगवान महावीर, भगवान महाबली यांचा सुद्धा खूप मोठ्ठा हातभार आहे. मानवी संस्कृती उभी करण्यामागे. दे सुद्धा मानवच होते. पण सर्व त्याग करून त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांप्रमाणे जगाला शांती आणि सुखाचा मार्ग दाखवला.