शनिवार, जुलै २३, २०११

मालिका

 

                        "मालिका" म्हणजे तुम्हाला कळलेच असेल. मला काय म्हणायचं ते! दिवसभराच्या कटकटी, दगदगीतून आपण धावत पळत घरी जातो. मस्त फ्रेश होउन टीव्ही समोर बसतो. आणि चालू होतात मनोरंजनाच्या विविध कहाण्या. १०० पैकी ९९ लोक तर अगदी फॅनच असतात या मालिकांचे आता बघा न मागच्या गुरुवारी मी असंच घरी बसलो होतो. तर शेजारच्या काकू आमच्या आजीसोबत गप्पा मारायला आल्या. सकाळच्या वेळी चहाचा घोट घेता घेता लोक काय विषय काढतील त्याचा नेम नाही. माझी आई आणि त्या काकू तर पिंजरा मालिकेच्या जबरदस्त फॅन झी मराठी ला रात्री ९.०० ला लागणारी हि मालिका आहे तशी जबरदस्त कथानकाची आणि त्यात टाकलेल्या प्रत्येक गोष्टी या दोघी रोज गप्पान मध्ये काढत, तर मी काय सांगत होतो? ह! तर या दोघी चहा पिता पिता चालू झाल्या, "त्या आक्काला जबरदस्त फटका बसलाय हो आता. कसला राग होता हो तिच्या तोंडावर, ते खविसासारखे डोळे कशी वटारून पाहत होती," लगेच काकू आजीला बोलल्या, "काय तरीच बाई ती इरसाल कार्टी शोभत नाही त्या वीर ला, आनंदी कशी मस्त आहे, गरीब पोरगी???, अश्या काहीश्या गप्पा त्यांच्या रंगून गेल्या होत्या, या गोष्टी ऐकतांना मनात भास आला कि, आक्का म्हणजे आमच्या घरातीलच कुणी बाई आहे कि काय? आणि वीर म्हणजे त्या काकूंचा नातू वैगेरे आहे कि काय? असो म्हणजे इतकच कि अत्यंत तळागाळात मालिका पहिल्या जातात आणि त्यावर गॉसिप्स पण रंगतात.
           मालिकांचा प्रभाव इतका आहेच अस नाही. चित्रपट, नाटक यांचा सुद्धा तितकाच प्रभाव गाणी तर आज काल पहिली दुसरीची मुल सुद्धा गुणगुणत फिरत असतातच. कुतुहूल आहे त्यांचे आमची एक कविता कधी पाठ होत नाही त्या पुस्तकातल, पण एक अक्ख गाण मात्र धडधडीत गाऊन दाखवू शकतो. इतकाच काय प्रत्येकाच्या विषयात आज मालिका इतक्या रुजल्यात न कि काय सांगाव, इतर गोष्टींचा प्रभाव असो न असो पण गाणी, चित्रपट आणि मालिकांचा खूप प्रभाव पडतो, आजच्या घडीला मालिका सुद्धा मल्लिका झालीये न मग प्रभाव पडणारच. तर मालिकांच्या विषयत रमणारे माझे मित्र  तर कित्ती विषय काढून काढून बोलतात बिंदास, कलर्स वरचे गच्चाळ कार्यक्रम काहींना इतके भावतात तर काही जणांना नावडतेच, आज आपल्याला दिवस भरात घडणाऱ्या जगभरच्या गोष्टींची बातमी पुरविणाऱ्या बातम्यांची सुद्धा मालिकाच केली गेली आहे. म्हणजे मालिकेशिवाय पर्यायच नाही न! असो आता काय स्टार प्लस वर तर अधिराज्य गाजवलेल्या कित्येक मालिका येवून गेल्या आणि त्या मालिका प्रेक्षकांच्या मनी सुद्धा रुजल्या.
           कलर्स वरच्या सामाजिक घटकावरील आधारित मालिका आपला स्वच्छ संदेश जनतेपर्यंत पोहोचवितात हे खरे, पण त्यांचा राग, रंग, रोष पाहून तो स्वच्छ संदेश कुठेतरी हरवून जातोच न! आपल्यातही असे कितीतरी मालिकाप्रिय लोक आहेतच कि जे स्वच्छ संदेश सोडून इतर गोष्टींमध्ये जास्त रस घेतात, त्याला हि उदाहरण आहे, झी टीव्ही ची मालिका पवित्र रिश्ता माझ्या काही मैत्रीणींना खूप आवडते, फावल्या वेळेत त्यांच्या त्यावरील गप्पा काय सुंदर रंगलेल्या असतात, त्यात मालिकेतल्या पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोडून अर्चनाची साडी, मानवची सुंदरता या वर असलेला विलक्षण प्रेम  इतक उतू येत म्हणून सांगू अजून काय तर स्वप्नांच्या पलीकडे आणि अश्याच काही जुन्या मालिकांचा विषय घेवून ऑफिस मधल्या मुली जेवण कधी संपवतात ते समजतच नाही. आताची तरुण मुले सुद्धा मालिका वीर बनतात हो कधी कधी, एकदा काय मालिकेत नवीन काही प्रेम विषयक दाखविले कि ते सुद्धा प्रेमासक्त होतातच. तसच राजकारण आणि समाजकारण, भक्ती आणि शक्ती अश्या अनन्य विषयावर आधारित कित्येक मालिका आपण रोज पाहतो आणि रोज त्यांचा आनंद घेतो. आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. काही ठिकाणी आपण चांगले उचलतो आणि काही ठिकाणी आपण वाईट सुद्धा उचलतो. सासू - सुनेच्या आधारित असलेल्या मालिका सासवा-सुना एकत्र  बसून पाहतात. तर कार्टून आणि लहान मुलांवरील काही सिरियल्स तर इतक्या रंगतदार असतात कि आज्या - नातवांची चिमुकल्या नात्खात भांडणान मध्ये आजोबा आपल्या नातवापासून नेहमीच माघार घेतात. लडिवाळ, प्रेम, माया आणि संस्कृती शिकवणाऱ्या या मालिका बंद झाल्या तर थोडस मन नाराज सुद्धा होणारच कि, शत्रूवर वार, मित्रावर भार या गोष्टी सुद्धातितक्याच महत्वाच्या न!

                    मालिकांवर असलेले हे प्रेक्षकांचे प्रेम कसे काय दुरावू शकते. मालिकांमुळे रोज रोज घडणाऱ्या या नवीन नवीन गोष्टी आणि त्यांची उदाहरणे तुमच्या सुद्धा डोळ्या समोर उभी राहिली असतील न! मला सुद्धा असंच वाटले, म्हणून आज तुम्हाला सुद्धा सांगितले. पहा आणि आनंद घेतच रहा अश्या नवीन नवीन मालिकांचा.. 

७ टिप्पण्या:

  1. कल्पि दिसलं हो तुझ टीव्ही प्रेम

    उत्तर द्याहटवा
  2. माझ प्रेम तसं नाही आहे मालिकांवर पण या सर्व लोकांच्या गप्पा टप्पा सतत कानी पडत असतात न

    उत्तर द्याहटवा
  3. मी कामावर जातो त्यामुळे मी जास्त मालिका बघत नाही आणि गरजही लागत नाही कारण जाताना गाडीत, फिरताना मार्केट मध्ये, आणि ऑफिस मध्ये वेगवेगळ्या मालिकाच चालू असतात.
    पण हे खर कि जे घरात बसून घर सांभाळतात त्यांना मालिकांचा आधार असतो कारण घरातली काम संपल्यावर काहीतरी छंद असणे गरजेचे असते त्यात पुस्तक वाचणे , काही घरगुती खेळ खेळणे, आणि मालिका बघणे आलेच . नाहीतर घरात बसून बसून माणूस उबून जाईल .
    मी घरी आल्यावर TV बघतो पण मी डिस्कव्हरी च्यानेल बघतो , त्यामुळे आमच्यात घरी मालिकांवरून मजेशीर वाद होतात आणि तेही गरजेचे असते. (((मला हे कळत नाही कि काही लोक तीच मालिका तीन तीन वेळा रिपीट टेलिकास्ट कशी पाहू शकतात )))
    कल्पेश पोस्ट छान आहे वाचून विचार करायला मजा आली

    उत्तर द्याहटवा
  4. मंदार धन्यवाद रे तुझ्या प्रमाणे मीही प्राणीमित्रच आहे

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद रेडकर साहेब, तसेच तुमच्या प्रतिक्रिया अश्याच मिळत राहोत हो इच्छा आणि तुमची ब्लॉग मी वाचली खूप आवडली, अत्यंत वाचनीय आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. माझे ही मत असेच आहे काहीसे-
    http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/05/blog-post_28.html

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद सागर,



    एक नमूद करू इच्छितो, कि "अग्निहोत्र" हि माझी खूप आवडती मालिका होती. प्रत्येक एपिसोड मी न चुकता पाहिला आहे, पण मालिकेचा शेवट वाघ मागे लागावा असा काहीसा केला तरी चालेल. हे नक्की तसेच मी तुमची पोस्ट मी वाचली. अत्यंत सुरेख ब्लॉग आहे. बहुदा तुम्ही ब्लॉग दिग्गज आहात.

    उत्तर द्याहटवा