शुक्रवार, ऑगस्ट १९, २०११

नियतीचा खेळ

नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!धृ.!!

रात-दिन पिसांचा तो गाभारा ती सजवला 
मात्र पोटी दाणा हो वेळीच तिने निजावला
कष्ट अंगी रुजलेले परी त्रास त्याचा न्हाय !!१!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!


उन, वारा, पाऊस तरी रोजचीच दिनचर्या ती
चालत राही आपल्या पिल्लांसाठी अखंड माय ती
तुटलेल्या धाग्यांत मन तरीपण मनात दावा न्हाय !!२!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!

इवलासा जीव तीन केवढा मोट्ठा केला
हृदयाच्या कोपऱ्यामंदी अपेक्षांचा अंत केला
पंख फुटलं पिलाला अन नियतीची सवय !!३!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!


सुरुवातआज काय ती सुरुवात मज करावीशी वाटली !
मनात दबलेल्या शब्दांना जागा कारिणी द्यावीशी वाटली !!

थरथरत्या शब्दांनी बडीश अशी काही साधली !
मन झाले तृप्त आणि काय जैसी उजळली !!

वैरी जाहल्या, कि मैत्रीत नाह्ल्या त्या गोष्टी !
शब्दांनी दाखवती माया अन वाक्य राहिली उष्टी !!

मान मिळवाया न व्हावे मग दुनियेत या कष्टी !
जर शब्द आहेत जोडीला अन त्यांची माया उतरी पृष्ठी !!

बंदी विचारांची वाट ती शब्दांनी केली मोकळी !
बंदिस्त मनीचे जग सुटले जणू या गोकुळी !!

अशी शब्दांच्या मायेन बडीश अशी सजली !
अन आज काय ती मज सुरुवात करावीशी वाटली !!