दोन दिवस घरी टीव्ही वरच्या बातम्या पाहून डोक हैराण झालय, किती ते आणि काय
होत ते काही समजेना, काल आय बी एन लोकमत वर पण साक्षात चुतीयागिरी पाहायला
मिळाली. आणि परवा स्टार न्यूज वाल्यांना तर आपला स्वतःचा काय सत्कार करून
घ्यायचा उत आलेला ते समजे ना! मुर्खांचा बाजार म्हणव कि बाजारातले मूर्ख!
जाहिराती सोडाच पण यावेळी राजकारण पण बरेच स्वार्थी झालेले होते आणि उलटी
गंगा म्हणून वाहायला लागले होते. शब्द बरे होते पण वेळ चुकली हे खर आणि
सोनिया गांधीने आपल्या मुलाच्या माकडउड्या आताच थांबवाव्यात. बालपणी बाळकडू
दिलेले दिसत नाही. लहान मुलासारखे वक्तव्य चक्क मिडिया समोर तो करत होता.
या चिमण्या बाळाला अक्कल यावी हीच सदिच्छा! आता याला एकट्या माकडाला काय तर जनता आता याच्यासारख्या प्रत्येक माकडाला सोडणार नाही आहे.
मुंबईवरचा हल्ला म्हणजे दिवाळी आहे का? जो तो उठतो काहीही बारगळतो आहे ते..... मागच्या कसाबने केलेल्या हल्ल्याला सुद्धा आर आर ने आरारा काय ओकले ते आजपण लक्षात आहे. काय, अश्या मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. वक्तव्य काही करोत हि लोक, पण नागरिकांनो, मुंबईकरांनो भारत हे एक राष्ट्र आहे. त्याच्या कुठल्याही प्रांतात, गावात, शहरात, गल्ली-बोळात हे गुन्हे घडणे थांबवायचे काम या लोकांचे आहे. आणि तेच काम त्यांनी आजतागायत केलेले नाही आहे.
प्रश्न दहशदवाद नाही, प्रश्न आहे दहशदीचा जी आज लोकांच्या मनात दडली आहे. आणि त्याला जोड देवून त्यावर गप्पा मारणाऱ्या या नेत्यांचा! काय तर म्हणे मुंबईकरांची व्हील पॉवर खूप जास्त आहे. काय स्पिरीट आहे त्यांच्यात? असा कानामागे खणखणात काढावा असे वाटले पण काय करणार आपण त्यातही काही करू शकत नाही. या राजकारण्यांनी आणि मिडियावाल्यांनी मिळून खरच मुंबईकरांना हतबल केलंय का? काम आणि घर इतकेच राहिलेय का? वास्तव चुकवून हे लोक कसल्या परीकथेतल्या जादूच्या गोष्टी दाखवतायत? काहीतरी विचार करावा. याचा संपूर्ण प्रभाव आपल्या सर्वसामान्य जनतेवर होतो आहे. सकाळचीच गोष्ट मी प्रवास करीत असलेल्या लोकल ट्रेन मध्ये सकाळी एक बँग होती. कुणाची होती देव जाणो, लोकांनी दहा वेळा आवाज दिला कुणी उत्तर देत नाही. म्हणून ती बँग सरळ बाहेर फेकून देण्यात आली. कुणाची बँग? कसली बँग? काही विचार करू शकत नव्हतेच ते उगाच कोण अंगाशी घेईल नको ते प्रकरण. म्हणून तिला सरळ बाहेर फेकून देण्यात आले. तिचा छडा लागेपर्यंत बॉम्ब वैगेरे फुटायचा त्यापेक्षा ती बाहेर फेकलेली बरी हे प्रथम त्या व्यक्तींच्या मनात! मग कित्ती लोक सहन करू शकतात. कुठे तरी हा राग व्यक्त होणारच.
आपल्याला काय या नेते मंडळींचा उपयोग आहे का? आज वाचले कि एटीएस आणि क्राइम ब्रांच मिळून या गोष्टींचा शोध लावणार आहेत. पण काय छडा लावणार आहेत. मागच्या ९/११ च्या रात्री जसे "चू" सारखे वागले तसे आत्ता हि वागतच आहेत न! आज हि मिडिया एक गोष्ट लपवायला तयार नाही. काही धागा लागला कि आली ब्रेकिंग न्यूज यांची न्यूज काय फ़क़्त मुंबईवाले वाचणार आहेत का? इतर लोक नाहीत का? त्यातच हि नेते मंडळी आपली सुंदर तोंड घेवून कॅमेरा समोर जे येतंय ते बरळतायत आणि आपण हे फ़क़्त पाहतोय. किती दिवस हा खेळ चालायचा.
दुनियेच्या पाठीवर उभे राहून राज्य करण्याची शक्ती एकट्या मुंबईत आहे. हे माहिती आहे म्हणून तर मुंबईला सारखे सारखे टार्गेट केले जाते. आणि महत्वाचे या नेत्यांना तिला टार्गेट केलेले पाहावेसे वाटते.आपण भोगतोय त्यासर्व गोष्टी निष्पन्न होत नाहीत बोलल्याशिवाय किंवा केल्याशिवाय आणि हे आपले दुराचारी नेते करीत आहे. मी साधारण माणूस आपला राग व्यक्त करणार तरी कसा हे माहिती आहे न त्याना मग फावते आहे चांगलेच... आय बी एन लोकमत फेमस निखील वागळेच्या मुलाखतीत अडकलेल्या त्या महारथींनी काल घडलेला बॉम्ब स्फोट सोडून १९९४ च्या मुंबई हल्ल्यावर प्रश्न उचलले गेले होते. अजून काय तर ज्या सोई सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. त्या अजून यायच्या बाकी आहेत. एक वर्ष झाले तरी कसब सुळावर चढेना आणि म्हणतायत कि पोलीस दलात आणखीन चांगल्या यंत्रांना आणणार आहे. एक वर्ष काय फ़क़्त प्रयत्न करायचे आहेत का? सरळ सरळ अन्यायी वागणे, बोलणे जणू काही अंगीच बळावले आहे नेत्यांच्या. २६/११ काय? ९/११ काय? १३/०७ काय? छापून आणायला मजा येतेय मिडीयाला आणि पत्रकारितेला!
मुंबईची सहनशक्ती पहिली आहे या नेत्यांनी आणि सर्व जगाने, आता राग पाहण्याची वेळ आलेली आहे. आज नाही तर उद्या हि ताकद तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही...
सावधान..............

:((((((((((((((((
उत्तर द्याहटवाप्राची काय झाल................ मी खूप राग शांत करतोय नाही तर प्रत्येकावर टिप्पणी करायची होती
उत्तर द्याहटवारणा, लेख आवडला... खूप मार्मिक आहे... आपल्या भावना व्यक्त केल्याच पाहिजेत, त्यामुळे आपल्यातला माणूस जागा रहातो... नाहीतर मग काहीवेळेस दाबून ठेवलेल्या रागाचे चुकीच्या वेळी चुकीच्या रूपात व्यक्त होऊ शकतो...
उत्तर द्याहटवाअगदी पाहायला गेल तर आपल्या कुटुंबावर होणारा प्रत्येक हल्ला पण आपण थांबवू शकत नाही... पण तो थांबविण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करतोच... अशाच प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे... आणि ते करण्यासाठी आपलीही साथ पाहिजे...
धन्यवाद, अभिषेक मी खरतर हा राग अजूनही शमवू शकलो नाही आहे.
उत्तर द्याहटवा