श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.
आली जीवनी तिच्या काळरात्र सोसेना भार तरी जड डोईवरी पात्र
क्षणात आठवणीनी कंठ हा दाटे, शेवट उभा सामोरी दुख: मनी वाटे
दैन्य नाही दुख: नाही, आठवणीत प्रियाच्या जीव व्यापला.
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.
श्वास तुटतो, मनी तुज पुकारतो, अश्रूंच्या धारातून जीव ओकारतो
आकांत प्रियेच्या कानी पडुनी, शेवटचे पाहू ध्यास एकच राही मनी
वेळ नाही हाती तीच्या, परी तिने ओठी शब्द फोडू पहिला
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.
साजण समोर नजरेत वाकलेला , पाहता जीव कासावीस सोकला
ओठात शब्द तुटतो हृदयात प्राण फुटतो, मिठीत प्रेमाच्या सोडूनी जाऊ पाहतो
कसे जावे, कसे राहावे शेवटी जीव सुटला, बंध तोडूनी प्राण झाला मोकळा
श्वास आखरीचा हृदयात गुंतला, डोळ्यात अश्रूंचा थेंब हा लपला.
--- कल्पेश मोहिते --->
Wah... mast :)
उत्तर द्याहटवाप्राची धन्यवाद, काल सुचली आज उतरवली
उत्तर द्याहटवाkhup chhan aahe... :)
उत्तर द्याहटवाaani tewadhich hrudayisparshi ...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद रे, भरत हि मी स्वतः लिहिली आहे >> Tont ??
उत्तर द्याहटवाकाय लिहिणार? फार भावनात्मक आहे ... साजण नजरेत वाकलेला विशेष
उत्तर द्याहटवाछान आहे.. साजण समोर नजरेत वाकलेला... किती अर्थ आहे भरलेला! इतक्या घायाळ कविता नको लिहीत जाउस यार... जान् जाते इकडे
उत्तर द्याहटवाअरे भरत धन्यवाद, ती लिहिली तेव्हा विचार केलाच नव्हता कि इतकी चांगली जमेल
उत्तर द्याहटवापियू तुझा टोंट सर आंखोपर कमेंट काढली
उत्तर द्याहटवाधन्स रे अभिषेक,
उत्तर द्याहटवाशब्द रचना करणे अजून कठीण जातेय
mastach ahe
उत्तर द्याहटवाThanks A Lot..... Sweetooo
उत्तर द्याहटवा