भिक मागुनी सुद्धा पदर नाही भरला.
"दे माय" ची हाक ऐकूनही कुणी काना-डोळा नाही केला.
एक भाकरी शिळी मिळेल का हो पुढ्यात
फाटक्या पदराशी जीव स्वतःचा बांधला,
तरी तिचा चाराण्या चाराण्यासाठी जीव वेडा जाहला.
कशी ती माय दुखाची आसवे काढिते,
रडते परी आपल्या पिलांना आठविते,मळक्या आयुष्याच्या प्रश्नांचा खेळ हा,
सोडूनी दिली त्या मायेला पिल्लाने भर रस्त्याला
तरी तिचा चाराण्या चाराण्यासाठी जीव वेडा जाहला.
सारी वाढविली पिल तिने मोठा केला गोकुळ,
संसाराच्या गाड्यात तिचा जीव सदा व्याकूळ,
एकटीच्या मरण यातना पिलांना नाही पोचल्या
रंग तिचा भंग परी तिने त्याला ओशळता केला.
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.
फुटले पंख पिल्लाला अन उडोनिया गेला आकाशी
माय मागे ठेवोनिया चित्त लावले संसारापाशी
केली फोडणी तत्वांची तिला एकटे केले जगी
परी नाही फोडिला टाहो अन नाही कल्लोळ केला
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.
वार्धक्याच्या सरतेवेळी कुणी नाही माझे
अर्ध्यावर राहिले आयुष्य नाही अग्नीस कुणी साझे
माय होती ती तिची आठवण नाही राहिली त्याला
एकटीचा जीव तिचा तीळ तीळ तुटत राहिला
तरी तिचा चाराण्या चाराण्या साठी जीव वेडा जाहला.
कल्पेश मोहिते
खरच शब्दांच्या पलिकडले .....
उत्तर द्याहटवाkhupach chaan ... :)
उत्तर द्याहटवावाह कल्पेश, डोळ्यात पाणी आलं.....
उत्तर द्याहटवाखरच प्राची, लिहितांना माझे मन पण असेच काहीसे होते.
उत्तर द्याहटवा