नमन नटवरा विस्मयकारा । नमन नटवरा विस्मयकारा ।।
वरील रंगदेवतेच्या सुश्रोषीत ओळी आज आठवल्या आणि रंगभूमीच्या सुरवातीला नाट्यसंगीताने रंगभूमीला झळाळून काढणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्वाचे नाव आठवले. लोकमान्य टिळकांच्या स्वरात, "अरे हा तर बालगंधर्व!" या स्तुतीसुमनांनी ज्यांचा गौरव झाला ते आपले बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस. बालगंधर्वांचा जन्म २६ जून १८८८ मधील सांगलीतील नागठाणे गावी झालेला, त्यांच्या गळ्यात लहानपणा पासूनच सरस्वतीचा आशीर्वाद वसलेला, उत्तम गायकी आणि स्त्री-रंगभूषेत स्त्री-नेपथ्य सादरीकरण हे वैशिष्ट्य तसेच नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते अश्या सर्व गायन प्रकारांवर प्रभुत्व, पं. भास्करबुवा बखले यांचे ते शिष्य होते. कारकीर्दीच्या सुरवातीपासूनच त्यांची गाण्याची पद्धत आणि संस्कार लोकान्मुख झालेले होते. आणि तेव्हाच त्यांना बालगंधर्व हि पदवी लोकमान्यांनी बहाल केली होती.
बालगंधर्वांच्या जीवनावर आधारित सुंदर मराठी चित्रपट नुकताच आला हा बालगंधर्व आपण पहिलाच आहे. त्यातच आपल्याला समजते कि बालगंधर्वांचे आयुष्य आपल्या कलेला किती वाहलेले होते. आज त्यांच्या स्मृतीत आपण कितीतरी त्यांची गाणी ऐकतो, वाचतो. आज त्यांचा जीवनपट वाचायला खूप साधने आहेत. त्या थोर कलासेवकाचे आजता गायत कित्ती तरी चाहते झाले असतील. पण त्यांच्या जीवनपटापेक्षाहि अत्यंत खडतर तर तेव्हाचे आयुष्य होते. नितीन चंद्रकांत देसाई कृत बालगंधर्वमध्ये पाहताना त्याच्या त्या खडतर आयुष्याची कहाणी एकदम जवळ येवून जाते. तेव्हाच्या काळी नाटक विश्वात स्त्री-पात्र करण्यासाठी स्त्रिया पुढे येत नसत आणि तशी त्यांना मनाई पण होती. तरीही स्त्री पात्र हुबेहूब रंगमंचावर आणण्याचे काम बालगंधर्वांनी केले. त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके केली. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. शाकुंतल नाटकातील शकुंतला आणि मानापमान या नाटकातील भामिनी मुळे तर बालगंधर्वांनी आपले नाव यश्याच्या उच्च शिखरावर नोंदवले. त्यांची ओळख जगात प्रतिभावंत जाहली. भरजरी साड्या आणि दागिने घालून जेव्हा बालगंधर्व रंगमंचावर अवतरत तेव्हा लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटायचे. मध्यंतरी काळात त्यांनी बरेच धक्के खाल्ले. बरायचं संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. परिस्तिथी कडेलोट होत असतांना सुद्धा त्यांनी रसिकजनाचा विचार केला आणि नाटके गाजवली. पत्र आणि नाट्य रंगमंचावर कसे उठून दिसायला हवे हे बालगंधर्वांच्या नाटकातून वाखाणण्याजोगे होते. बहुतांश मंडळी आजही त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून जगतात. १९५५ साली त्यांनी एकाच प्याला मध्ये साकारलेली सिंधू हि त्यांची शेवटची भूमिका होती. तदनंतर रंगविश्वातून त्यांनी निवृत्ती घेतली. १५ जुलै १९६७ मध्ये बालगंधर्वांचे निधन झाले. आणि रंगभूमीचा मोलाचा आशीर्वाद हरपला.
मराठी रंगभूमीच्या या दिव्यरत्नाबद्दल माहिती
http://mr.wikipedia.org/wiki/नारायण_श्रीपाद_राजहंस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा