मंगळवार, जून २१, २०११

आई

 जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।

  असे ऋण हे की जया व्याज नाही।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

  जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।

  जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।

  जिने लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

  जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई।।

 















नोट : आवडलेल्या कवितांचे कवी/कवियत्री चे नाव माहित नसून फ़क़्त ब्लॉग वर वाटून घेण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा