शुक्रवार, डिसेंबर ०२, २०११

जीवन आपले Computer असते,



अगर जीवन आपले "Computer" असते तर, किती बरे झाले असते

जीवन जगणे चालू करण्या "Start" बटण लागले असते

हृदय आपले "CPU" असते तर विचारांची Print निघाली असती,

हृद्स्पंदने अगर "Pen Drive" असते अन भावनांचा "Backup" घेतला असता,

मनात आपल्या "Bluetooth" असता तर न बोलू शकणाऱ्या गोष्टीना "Transfer" केले असते.

डोळे असते "Webcam" मग दिसणाऱ्या चित्रांना "Receive" केले असते

खरंच जीवन अगर एक "Computer" असते तर त्याला सुद्धा "Restart" केले असते

अन सारे जीवन पुन्हा पुन्हा जागून पहिले असते.

२ टिप्पण्या:

  1. छान आहे, पण
    जीवन; जीवन आहे,
    जगणे त्याच्या छंदात आहे,
    त्याची तुलना कोणाशी करावी का?
    त्याची जागा कोणी घेऊ शकत का?
    आहे कम्प्युटर माणूस होता म्हणून
    आहे माणूस देव असतो म्हणून
    वेध लागले माणसाला मोठे
    कर्त्याची जागा खोटे खोटे
    पडता खाली अडकून पाय
    फुटले कपाळ मोठे मोठे
    शेवटी माणसाला तेंव्हाच वळे
    जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे

    उत्तर द्याहटवा
  2. अरे, अभी इतक मनावर घेतलंस आणि वेड्या हे शेवटी काल्पनिकच रे..... तरीही तुझ्या या शब्दांना तोड नाही आहे.

    उत्तर द्याहटवा