एक दिवस उनाडकीचा...



वरील फोटोत नाही म्हणून वेगळा फोटो







        अहह!!! शेवटी भेट झालीच म्हणा. ठरल्याप्रमाणे  मजेचा दिवस पूर्ण झाला. कॉय मज्जा आली म्हणून सांगू, प्रयत्न इतके छान जमले कि वर्णन काय करावे.

     बझ्झवर समोरच्याला न बघता बोलायचं आनंद काही वेगळाच, पण तो आनंद जेव्हा प्रत्यक्षात त्या व्यक्तींना भेटतो तेव्हा तो आनंद द्विगुणीत त्रेयगु
णीत होतो. याची प्रचीती २६ जानेवारीला झाली बुवा!!!!!!!!!!!, हम्म!!!!!!!!!! विषय काढलाच आमच्या मृगजळाने प्रथम भेटीचा, भेटावे म्हंटले आणि बघता बघता प्रत्यक्षात घडले. १५ - २० दिवसांपासून बझ्झवर रेलचेल ती भेटीची, कोण कोण येणार ते ठरवल गेल. कसं? कुठे? कधी? केव्हा? सर्व प्रश्न बझ्झवरचं सुटले, शेवटच्या दिवसाला मात्र एक एक करून बझ्झकर कमी होऊ लागले, अतिशय दडपण हो! आता काय एकट तिथे जाऊन काय करायचे? पण संध्याकाळी दिलासा मिळाला आणि बझ्झकरांचा आकडा २० वरून १२-१३ वर येऊन थांबला. हुश्शा, मग काय तो सोन्याचा दिवस उजाडलाच आणि सर्व तेरा बझ्झमंडळीची भेट झाली.
      पुण्याहून गाडीने, नवी मुंबईहून बस ने, मुंबईतले रेल्वेने दादरला कसेबसे धडपडत पोहोचले. कार्यक्रम अगदी उशिरा चालू झाला. तरीहि सुंदर रंगला मित्रांनो, काय स्वागत? काय ओळख? सुंदरच... असा भासहि झाला नाही कि आम्ही नाविन्यपूर्ण भेटत आहोत. उलट असे वाटले कि जुनेच शाळा-कॉलेज मधले मित्र मैत्रींनी भेटलो आहोत. तशी आम्ही कार्यक्रमाची कोणतीही रूपरेखा आखलेली नव्हती. पण ताची रंगत त्याहून मसालेदार ठरली. अवघे विश्व मैत्रीशिवाय अपुरे हेच साध्य झालं.
     कॉलेजचे दिवस कट्ट्यावरची मजा सर्व काही आम्ही एका भेटीत अनुभवलं हो. आधी उद्यान गणेश दर्शनापासून सुरुवात केली आणि मस्त छान असा शिवाजी पार्कचा फेरफटका मारला. त्यात दादरची न्याहाळणी वेगळ्याच पद्धतीने अनुभवता आली. फिरणे अर्ध्यावर सोडून पोटासाठी वणवण फिरावे का? असा विचार चालू असतांना, मंदारने सुचविले, "कशाला? दादरच सुविधा आहे नं!" मग काय मस्त ताणून जेवलोत सर्वेच, आता मेन्यू म्हणजे जेवणात मशरूम मसाला लज्जतदार पनीर मटार आणि चविष्ट मिश्रहंडी असा मागविला आणि सोबत रोटीची कटोरी असं भास झाला कि सर्व भारतीय भाकऱ्यांचे  प्रकार खातोय कि काय?, आणि ते तर सोडाच नंतर शाहीडाळ आणि जीरा भाताने तर पोट टम्मच केलं बुवा!!!!!!!!!!! जेवणाचा आस्वाद काही औरच होता. तो सुद्धा नवीन मित्र मैत्रिणीन समवेत, रंगत तर चांगलीच रागात चालली होती सर्वांच्या गप्पाटप्पानमुळे, आणि अख्खी मंडळी अजून खुश झाली तीपण मध्यंतरात भेटण्यास आलेल्या पाहुणीमुळे आमची मजा थोडी अजून वाढली कि, मग काय माझा खोडसाळपणा, निवेदिताची बडबड, निलेशची निर्भेळ शांतता, प्रणिता - प्राचीचा सौम्यपणा, मंदारचा साधेपणा, स्नेहाचा खळखळपणा,  प्रणिताचा हटकेपणा, वैशालीची भयानक शांतता, अर्जुनाची दिव्यता आणि गणेशचं मोठेपण खूप खूप अवखळ होतं त्यात हे सर्व टिपणारा अतुलचा स्वच्छंदीपणा अगदी मनात भरण्याजोगा!
आणि सर्वात महत्वाचा तो आमचा अमर खास भेटण्याकरिता दिल्ली दूर ठेऊन आलेला त्याचा
खेळकरवृत्तीचा मिश्कीलपणा तर काही औरच होता.      
             जेवणाची हि सफर पूर्ण होते नं होते तोच आमचा मंदार सिद्धिविनायकाच्या दर्शनाची तयारी करू लागला. चालत चालत दर्शनाला जाताना छोट्या छोट्या गमती जमती पण आनंद देत होत्या, प्रश्न उत्तरे, नखरे, हसणे, खळखळने याने तर आमचा प्रवास अगदी मस्त चालला होता. हळू हळू करून मजा मस्ती करत पोहोचलो सिद्धिविनायकाला. आम्ही मंदिरात जाण्याकरिता पुढे आलो आणि काय तर तो एक पोलीस "कॅमेरा आत नेऊ शकत नाही." असं कोकलला! आता काय? राहिले दोघेजण बाहेर, आता आत गेलो तर पदत्राण्याची काळजी राहिले अजून दोघेजण बाहेर, आता काय? तर दर्शनाला रांग भारी मग पासची युक्ती समोर आली पण ती सुद्धा काही जमेना, सर्वात नंतर मुख दर्शन घ्यायचे ठरले. आणि दर्शन झाले सुद्धा काय मस्त गणपती बाप्पा खूप होता आमच्यावर समोरची गर्दी सावरून आम्हाला दर्शन देत होता जणू.... शेवटी श्रींचे दर्शन झाले आणि आम्ही धन्य झालो. लांबून आलेल्या मित्रांकारिता तर ती एक खास पर्वणीच ठरली होती बरं का!  
        मग शेवटी शेवटी आम्ही गेलो अजून एका ठिकाणी ज्यात सर्व दुख: सामावते, तरीही त्याला उधाण असते अश्या समुद्राच्या भेटीला, आम्ही दादर चौपाटी चालत चालत गाठली. जगाला समृद्ध करणारा महान विधाता सुर्यनारायण निजवेळेस निघाला होता. त्याच्या मंद प्रकाशात आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. तेव्हा कीट क्याट ब्रेक घेतला चोक्लेटांनी सगळ्याची तोंडे गोड झाली. मग काय मजाच मजा फोटो काढून काढून थकले आणि नंतर शांत निवांत बसून गप्पा मारू लागले. शेवटी टिंगल-टवाळ्या
करत करत निघालो पुन्हा शिवाजी पार्क च्या दिशेला, आता खरी गम्मत झाली हो... इथे तिथल्या सी-सँड ब्लॉक्सच्या वरून उड्या मारीत मारीत चैत्यभूमीच्या पलीकडे गेलो. पण  गम्मत अशी कि एरवी २ मिनिटात पार करणारा तो कट्टा मी तब्बल १० - १५ मिनिटे उशिराने पार केला, बापरे!!!!!!!!!!! मजाच अशी काही चालली होती तिथे म्हणून सांगू, खरतर ती ट्रेकिंग ठरली आमच्यासाठी हा.. हा... हा... सर्व कसे जपून जपून पार करत होते. खूप मजा आली. त्यानंतर चालत चालत चैत्यभूमी बागेत हळुवार मंदपणे फिरत फिरत आम्ही शिवाजी पार्कच्या रस्त्याला आलो. आता पहिले मंदारला बाय बाय केले आणि निघालो पुढे....... आता काय तर सर्वांना लागली चहाची तल्लफ! पण चहा म्हणे माशिनीचा तो नक्कोच बुवा, तर फिरलं पाणी तल्लफिवर,  सर्व रंगत संपवून निरोपाची वेळ जवळ आली होती.
           आमच्या अर्जुनाच्या रथाजवळ आलो आणि शेवटचे निरोपास्त्र काढले. सर्वांच्या तोंडावर बारा वाजले होते ते सुद्धा सायंकाळी पाच वाजता, लांब राहणारे आमचे सारे मित्र विना चहाचे रथात स्वार झाले. अर्जुनाचा रथ म्हणजे इंडिका विस्टा चकचकीत मोती रंगाची हा!,  दादरच्या शिवाजी पार्कच्या झाडांनी तिच्यावर मस्त पानांचा वर्षाव केला होता अगदी! आमचे पुणेकर सर्व गाडीत बसले. जाताना इंद्रधनूच्या नजरेत बसत नव्हता तो शेवटचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेली. गाडी गेली आणि १ मिनिटाच्या आत दृष्टीआड झाली. रथस्वामी अर्जुन गाडी भुरकन घेऊन गेले. मग उरलेल्यांनी दादर रेल्वेस्थानक गाठायचं ठरवले. पुन्हा चहाची तल्लफ लागली आता तासभर चालून एक चहाच्या हॉटेलात गेलो आणि मस्त चहा ढोसला तो पण बिस्कीटासोबत. नंतर हळू हळू आमची पावले आपल्या आपल्या घरी वळू लागली. दादर स्थानक गाठून गाडी पकडली आणि एक एक करून सर्वजण निघून गेले. शेवटला ठाण्याच्या १० नंबर फलाटावरील गाडीत बसून शेवटची क्षिती सुद्धा गेली. आणि मी घरी परतलो.
         आणि अस झालं आमच्या बझ्झ मंडळाचा गेट टूगेदर..................................


कृपया ब्लॉग मध्ये काही वावगं असल्यास नजरे आड करावे. आणि आवडल्यास प्रतिसाद द्यावा.

धन्यवाद,










माझ्या मित्रांनी लिहिलेल्या या वर्णनावर सुद्धा लक्ष द्या हं!!!!

इंद्रधनू = http://purvatarang.blogspot.com/2011/01/blog-post_27.html?spref=gb

स्पंदन मनाचे मनाशी = http://amarranbhare.blogspot.com/2011/01/blog-post_28.html
 

क्षितिजाच्या पलीकडे = http://vicharmoti.blogspot.com/2011/01/blog-post_28.html

मम्मी पप्पांची लाडकी मुलगी  = http://asachkahimalasuchalele.blogspot.com/2011/01/blog-post_5585.html#comments


अर्जुन देशपांडे = http://arjunliv.blogspot.com/2011/01/blog-post_31.html
 

१३ टिप्पण्या:

  1. Kalpesh,
    very well written....
    so perfect narration that i could visualize it!!!
    khooop chhan lihileys!!!
    Keep writing and keep sending us to read...

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद, श्रद्धा मी खरंच पाठवेन तुम्हाला लिंक्स

    उत्तर द्याहटवा
  3. mumai-pune-mumbai................ekdam susat.......ashich non stop rahu de..............

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद, भरत तू असतास तर खरंच मजा केली असती

    उत्तर द्याहटवा
  5. निलेश तुम्ही आलात म्हणून मजा जास्त आली रे


    आल्या बद्दल धन्यु

    उत्तर द्याहटवा
  6. इंद्रधनू सर्व तुम्ही आलात म्हणून शक्य झालं

    उत्तर द्याहटवा
  7. अमर तुझं ब्लॉग पण सुंदर आहे

    सुशीलदादा धन्यवाद

    उत्तर द्याहटवा