बुधवार, जानेवारी १९, २०११

"देव हि एक संकल्पना"


देवा मला पाव! अरे देवा! देवा मला मदत कार! देवा माझी परीक्षा का घेतोयास? हि आपली रोजच्या वापरातील वाक्य देवाकरिता बरोबर नं!!!!

देवाकडे आपण बुद्धी, प्रेम, माया, पैसा, समृद्धी, शांती, आरोग्य वैगेरे वैगेरे काय काय म्हणून नाही मागत. तसं काही भेटतं का भेटला तरी त्याने दिलेला असता का? मग काय म्हणावे या देवाला, जागृत सत्य, सात्विक शक्ती कि वैश्विक संकल्पना.




देव हि एक वैश्विक संकल्पना आहे असा म्हंटल्यास तुम्ही काय बोलाल?

देव मूर्तीत नसतो पण देव मनात असतो म्हणून त्याला आंतरिक शक्ती, म्हणून का प्रेरणा भेटते आपल्याला! पण खरंच जर शक्ती असती आपल्यात किंवा मनात तर मनुष्य ज्ञाता झाला असता मग काय मजाच असती त्याची, तसच परमेश्वर आणि प्रकृती यांत प्रामाणिकपणे सांगायचं तर काहीच वेगळेपण नाही परमेश्वर प्रकृतीतचं आहे. बरं चला धार्मिक वृत्तीने सांगायचं झालं तर प्रत्येकाच देव वेगळा पण त्याच काम एकाच भक्ताची काळजी घेणे. पृथ्वीच्या कुठल्याही कोनाड्यात जा देव नावाची संकल्पना आहेचं मग अख्खं विश्व ज्या गोष्टीला धरून चालतंय ती शक्ती कशी असेल संकल्पनाच बहुतेक प्रकृती दिसते. पण तिचा आधार नाही भेटला अजून,


धर्मं आहे ना आपल्याकड़े त्यातच बघा कि, देव वेगळ्या वेगळ्या रुपात आहेच ना............................
हिन्दू - दया
बौद्ध - शांति
ख्रिस्ती - प्रेम
इस्लाम - इमान
पारशी - भूतदया
गुजराथी - तृष्णा
बंगाली - माया
मद्रासी - जिद्द
पंजाबी - एकता
या सर्व गोष्टींमध्ये आपण देव पहतोच ना मग तो काही वेगळा नाही. हे प्रकृतीचे नियमपण आहेत कि, 
माणूस चंद्रावर गेलाय त्याच्याही बाहेर गेलाय हजारो प्रकाशवर्षे पुढे त्याही पुढे जाण्याची मजल मारणार हे त्याच्या मनातील तथ्य पण त्याला अडवू शकणारी शक्ती म्हणजे फ़क़्त प्रकृतीचं, तिचाच हात आहे नं पृथ्वी आणि तिच्या बाहेर, तिला रूप नाही रंग नाही आकार नाही भावना नाही दया नाही क्षमा नाही ह्या सर्व गोष्टी असत्या तर मरण नावाची गोष्ट नसती आणि पृथ्वी सोडून मानवाचं अधिराज्य आकाशगंगा किंवा त्याहीपुढे असता कदाचित, आताच तिच्या अंतरंगातील गोष्टींची पूर्ण माहिती मिळत नाही आपल्याकरता जी इतके मोठ्ठे रहस्य आहे ती प्रकृती देव या संकल्पनेत मिसळलेली आहे. संकल्पना म्हणजे काय विशिष्ट गोष्टीपासून तर्काने वा विचाराने मिळणारी सामान्य वा अमूर्त कल्पना बरोबर मग आपल्या प्रकृतीच्या तर्कानेच तर हि देव "संकल्पना" गोष्ट उभी होते. आणि तिला अख्खा विश्व विचारांत घेतो म्हणून "वैश्विक". फ़क़्त तिला आदराने विचारात घेतो म्हणून ती देव होते. प्रत्येकाचा देव त्याचा कामात, परिश्रमात, मनात, ध्यानात, वागण्यात, असतो उदा. कलाकारांचा देव म्हणजे कला (कुठलीही नृत्य, नाट्य, भाष्य, चित्र, हस्त) मग आता काय म्हणायचं देव आहे कि नाही. नाहीच म्हटलं तरी १०० प्रश्न आणि हो म्हटलं तरी १०० प्रश्न मग सांगा काय खरंच देवाची व्याप्ती इतकी मोठ्ठी आहे. कि आपण कल्पना नाही करू शकत आणि त्याला संकल्पना पण नाही बोलू शकत. जे दिसतंय ती प्रकृती आणि विचारापलीकडे आहे ते म्हणजे देव.

देव आहे तरीही दुख: आहे. देव आहे दैन्य आहे. देव आहे तरीही संकट आहे.


देव माना किंवा नका मानू सर्व घडतंय त्याच्यामागे शक्ती आहे. आणि ती म्हणजे प्रकृतीचं

 
         
कृपया कुणीही आपल्या भावना दुखावून घेऊ नये. तसे झाले असल्यास क्षमस्व. मी माझे विचार मांडले तुमच्या उत्तरांना सुद्धा प्रामाणिकपणे विचारांत घेईन. 
http://kalpshbdha.blogspot.com/2011/01/marathi-jokes-marathi-chutkule-vinod.html

शनिवार, जानेवारी १५, २०११

देव कुठं आहे ?




दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.

त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.

मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.

झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.

साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''

तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.

पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''

पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.

आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''

तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''

'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.

लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''

Shared Post