शुक्रवार, ऑगस्ट १९, २०११

सुरुवातआज काय ती सुरुवात मज करावीशी वाटली !
मनात दबलेल्या शब्दांना जागा कारिणी द्यावीशी वाटली !!

थरथरत्या शब्दांनी बडीश अशी काही साधली !
मन झाले तृप्त आणि काय जैसी उजळली !!

वैरी जाहल्या, कि मैत्रीत नाह्ल्या त्या गोष्टी !
शब्दांनी दाखवती माया अन वाक्य राहिली उष्टी !!

मान मिळवाया न व्हावे मग दुनियेत या कष्टी !
जर शब्द आहेत जोडीला अन त्यांची माया उतरी पृष्ठी !!

बंदी विचारांची वाट ती शब्दांनी केली मोकळी !
बंदिस्त मनीचे जग सुटले जणू या गोकुळी !!

अशी शब्दांच्या मायेन बडीश अशी सजली !
अन आज काय ती मज सुरुवात करावीशी वाटली !!

४ टिप्पण्या:

  1. :) छानच आहे..
    कवितेत छंद काय काय असतात ते समजावून घे... म्हणजे अजून नादमय होईल कविता... आता आहे ती अर्थपूर्ण आहे... छंदानुसार लिहिलीस की अजून कवितामय होईल

    उत्तर द्याहटवा
  2. हम्म, पण आता ते शिकावे लागणारच कि मी अजून बालवाडीतच आहे

    उत्तर द्याहटवा