दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.
त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.
मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.
झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.
साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''
तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.
पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''
पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.
आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''
तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''
'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.
लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''
Shared Post

VERY NICE
उत्तर द्याहटवा