गर्द कोवळ्या मनाची हा कुठे श्वास कोंडला!
काळोखाच्या उंबऱ्यात का जीव असा सोडला!!
धुंद विश्वात जगणे आतुर भेटी बहु पाहुणे!
काळोखी जणू मनुचीया हि सावज झाली मने!! धृ.!!
हृदयी प्रेमे, चेहरे अनामिक काळजात ठासले!
एकलाची जणू जीव जगी या जगण्यास फेकले!!
प्रश्नाच्या या जंजाळातून उत्तरे ना स्तवने!!१.!!
काळोखी जणू मनुचीया.....
तव धनुष्या टोकावरची धार पुनः बोथटली!
सप्त रंगांच्या आयुष्यात हि काळरात्र पसरली!!
मन हे आतुर, वेडे फिरुनी लक्ष जाळी हि हवने!!२.!!
काळोखी जणू मनुचीया.....
रात्र दिव्यांची, दिन अंधारी तुटते रे आतडे!
गर्दीत जणू चिरडले रे दुखी-व्याधीत कातडे!!
पाषाणाच्या प्रेमापोटी खंडित हृदय अन मने!!३.!!
काळोखी जणू मनुचीया.....
संसाराचा हा रे पसारा क्षणभंगुर न वाटे!
दुख एकीचे वाटुनी सगळे शंका मनी का दाटे!!
विश्वासाचा धागा तोडूनी नाती न जोडणे!!४.!!
काळोखी जणू मनुचीया.....
कास लक्ष्मीची, आर्त भुकेची पापांची माऊली!
ओसाड पडती मग पुण्ये हि फोडती रे टाहोळी!!
अश्रूंच्या त्या हिंदोळ्यावर आटती हि स्पंदने!!५.!!

वाह कल्पेश.... खूप सुंदर भावना मांडल्या आहेस.... आणि एकदम वास्तव साकारलं आहेस...
उत्तर द्याहटवाअत्यंत धन्यु प्राची, भावनांचा आदर करण कर्तव्यच आपल
उत्तर द्याहटवा