नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!धृ.!!
रात-दिन पिसांचा तो गाभारा ती सजवला
मात्र पोटी दाणा हो वेळीच तिने निजावला
कष्ट अंगी रुजलेले परी त्रास त्याचा न्हाय !!१!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!
उन, वारा, पाऊस तरी रोजचीच दिनचर्या ती
चालत राही आपल्या पिल्लांसाठी अखंड माय ती
तुटलेल्या धाग्यांत मन तरीपण मनात दावा न्हाय !!२!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!
इवलासा जीव तीन केवढा मोट्ठा केला
हृदयाच्या कोपऱ्यामंदी अपेक्षांचा अंत केला
पंख फुटलं पिलाला अन नियतीची सवय !!३!!
नियतीचा खेळ बाई बघा कसा काय ?
मोठ्ठ झाल पाखरू अन उडुनी गेली माय !!
सुंदर कविता, चाल सुद्धा लगेच मिळते, आणि घरा घरातली परिस्तिथी दिसते
उत्तर द्याहटवाबापरे कल्पेश, हे तू लिहील आहेस! विश्वास बसत नाही! :)
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर कल्पना आहे... मला फार फार आवडली
Thanks a lot Mandar & Abhishek
उत्तर द्याहटवा